राज्यातील शेती क्षेत्र हे अधिक आधुनिक, तंत्रज्ञानस्नेही आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त करण्याच्या दृष्टीने कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित महत्वपूर्ण अ ॅप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यामध्ये महा एजी एक्स हा राज्याचा महत्वकांक्षी डेटा प्लॅटफॉर्म असून, कृषी क्षेत्रातील माहिती सुरक्षित पद्धतीने एकत्रित करून संशोधन, नवोन्मेष व धोरणात्मक निर्णयांसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा करणार आहे. हा प्लॅटफॉर्म नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून विकसित केला आहे. महा-अ ॅग्री एआय धोरण २०२५-२०२९अंतर्गत नेदरलँड्समधील वॅगेनिंगेन विद्यापीठ आणि संशोधन संस्थेसोबत सामंजस्य करारकरण्यात आला आहे.






