चंद्रजीत यादव यांना जीवनगौरव

महाराष्ट्र टाइम्स

The Bombay Art Society will present the Rupdhar Lifelong Achievement Award to sculptor Chandrajit Yadav. This award is part of the 134th All India Annual Art Exhibition. The event will take place at the Jehangir Art Gallery from February 24 to March 2. The exhibition provides a platform for young artists. Several other awards and scholarships will also be presented.

renowned sculptor chandrajeet yadav honoured with bombay art societys rupdhar lifetime achievement award

बॉम्बे आर्ट सोसायटीच्या अखिल भारतीय वार्षिक कलाप्रदर्शनात २१ वर्षांपासून दिला जाणारा रुपधर जीवनगौरव सन्मान यंदा प्रख्यात शिल्पकार चंद्रजीत यादव यांना जाहीर झाला आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १३४व्या अखिल भारतीय वार्षिक कलाप्रदर्शनाचे आयोजन जहांगीर आर्ट गॅलरी येथे २४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल व प्रा. किशोर इंगळे यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन होत आहे.

याबाबत बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी माहिती दिली. ‘गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून हे प्रदर्शन देशातील नवोदित कलाकारांना संधी देणारे आणि भारतीय दृश्यकलेची परंपरा जपणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे. यंदा देशभरातील तरुण आणि नवोदित कलाकारांकडून मिळालेला उदंड प्रतिसाद सोसायटीचे राष्ट्रीय पातळीवरील महत्त्व अधोरेखित करतो’, असे ते म्हणाले. रुपधर जीवनगौरव पुरस्कारासोबतच चित्रकला, शिल्पकला, ग्राफिक्स आणि छायाचित्रण अशा विविध विभागातं एकूण ४६ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत तसेच प्रसाद मेस्त्री यांना बेंद्रे- हुसेन शिष्यवृत्ती, सोनल सालेकर यांना संध्या मिश्रा शिष्यवृत्ती तर कृष्णपाद मैती यांना रवी आणि स्मिता परांजपे चित्रदीक्षा शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे.