‘तेजस’चे उड्डाण थांबवले

महाराष्ट्र टाइम्स

The Indian Air Force has grounded its entire fleet of Tejas fighter jets. This decision follows an incident on February 7 where a Tejas aircraft sustained damage after overshooting the runway. This marks the third such incident in two years. The Air Force is taking this precautionary measure to prevent further accidents.

after consecutive accidents indian air force grounds entire fleet of tejas fighter jets flights temporarily banned

भारतीय हवाई दलाने ‘तेजस’ लढाऊ विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घालून, संपूर्ण ताफा जमिनीवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ७ फेब्रुवारीला घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. या घटनेत धावपट्टीवरून पुढे गेल्यामुळे विमानाचे नुकसान झाल्याचे समजते. मात्र, या प्रकरणावर हवाई दलाने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत तेजस विमानांचा हा तिसरा अपघात असल्याने हवाई दलाने हे कठोर पाऊल उचलले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबई एअरशोमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. सलग होणाऱ्या अपघातांमुळे या विमानांच्या तांत्रिक सक्षमतेची सखोल तपासणी केली जाणार आहे.

संबंधित वृत्त...६