चित्रपट कामगारांना मदतीचा हात

महाराष्ट्र टाइम्स

चित्रपट कामगारांसाठी यश राज फिल्म्सने 'साथी २०२६' उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे चित्रपटसृष्टीतील पडद्यामागील कलाकारांना वर्षभर आर्थिक, आरोग्य आणि शैक्षणिक मदत दिली जाईल. ज्येष्ठ आणि दिव्यांग कामगारांना विशेष प्राधान्य दिले जाईल. हा उपक्रम कामगारांच्या जीवनात सुरक्षितता आणि आधार देईल. अधिक माहितीसाठी /ycf या संकेतस्थळाला भेट द्या.

announcement of sathi 2026 initiative for cinema workers

दिवंगत ज्येष्ठ सिनेनिर्माते आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या आठवणीत आणि मानवंदना म्हणून यश राज फिल्म्सच्या वतीने यश चोप्रा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. चोप्रा यांच्या संवेदनशील वारशाला मानवंदना देत यश राज फिल्म्स अंतर्गत स्थापन झालेल्या यश चोप्रा फाऊंडेशन तर्फे ‘ साथी २०२६ ’ची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटसृष्टीच्या पडद्यामागील खऱ्या नायकांसाठी वर्षभर चालणारा हा कल्याणकारी उपक्रम त्यांच्या आयुष्याला सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि आधाराचा हात देणारा ठरणार आहे.

चित्रपटसृष्टीतील कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना सातत्यपूर्ण व संरचित सहाय्य देण्याचा उद्देश यामागे आहे. एकदाच दिल्या जाणाऱ्या मदतीपलीकडे जाऊन, मूलभूत गरजा पूर्ण करणे आणि जीवनमान उंचावणे हा या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे. सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या कामगारांना मासिक घरगुती मदत, औषधे व वैद्यकीय तपासण्या यांसह आरोग्यसेवा सहाय्य, मुलांच्या शिक्षण व शालेय गरजांसाठी मदत, तसेच वार्षिक मूळगावी जाण्यासाठी आवश्यक प्रवास सहाय्य यांचा समावेश आहे. ६० वर्षे व त्यापुढील वयाचे निवृत्त चित्रपट कामगार आणि दिव्यांग व्यक्तींवर विशेष भर देण्यात आला आहे, कारण त्यांच्या आरोग्यविषयक गरजा अधिक असून उत्पन्नाची साधने मर्यादित असतात. 'साथी उपक्रमा'साठीत पात्रतेमध्ये मान्यताप्राप्त संघटनांमध्ये नोंदणीकृत सक्रिय चित्रपट कामगार, कमी उत्पन्न असलेली कुटुंबे, शाळा किंवा महाविद्यालयात शिक्षण घेणारी मुले असलेली कुटुंबे, तसेच सातत्याने वैद्यकीय उपचारांची गरज असलेले ज्येष्ठ कामगार यांचा समावेश आहे. या 'साथी २०२६' उपक्रमाविषयी अधिक माहितीसाठी yashrajfilms.com/ycf या संकेतस्थळाला भेट देता येईल.