(पान एकवरून)
आरोग्यव्यवस्थेसाठी साह्यभूत ठरत असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ‘एआय’ कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.
‘एआय’द्वारे प्रायोगिक तत्त्वावर व्हर्च्युअल क्लिनिक , तज्ज्ञ सहकार्य, खाट व्यवस्थापन, रोग सर्वेक्षण, मनुष्यबळ नियोजन इत्यादी करता येणार आहे. तसेच आरोग्य एआय चॅटबॉट आणि इतर अॅप प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार असल्याचे कळते. रुग्णालयांना बळकटी, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, कॅन्सरसंदर्भातील सर्वेक्षण, मुली तसेच महिलांना कॅन्सर प्रतिबंधासाठी लसीकरण, विविध प्रकारच्या संसर्गजन्य तसेच जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या आजारांना प्रतिबंध यासंदर्भातील आरोग्य तरतुदींचा विचार पालिकेच्या आरोग्य अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कर्मचारी गट विमा योजना अशा प्रकारच्या योजनांमध्ये कॅशलेस आरोग्यसेवा परिसंस्था राबवण्यात येईल. त्यामुळे रुग्णांना विविध शासकीय तसेच विमा योजनेतंर्गत सहजपणे वैद्यकीय उपचार मिळतील त्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.
वीजबिलामध्ये कपात
महापालिकेच्या नायर रुग्णालयांमध्ये सौरऊर्जा पॅनल बसवण्यात आल्याने विजेच्या बिलामध्ये ५० टक्के बचत झाली आहे. या धर्तीवर ‘सीएसआर’द्वारे पालिकेच्या इतर सर्व रुग्णालयांमध्ये तांत्रिक कार्यक्षमता तसेच योग्यता तपासून सौरऊर्जा पॅनल बसवण्यात येणार आहे. त्यामुळे विजेच्या बिलामध्ये ४० ते ५० टक्के बचत होईल. या धर्तीवर पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये तांत्रिक कार्यक्षमता तपासून सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात येणार आहे.






