नागपूर : जगन्नाथपुरी (ओडिशा) येथे आयोजित २१व्या अखिल भारतीय अधिवेशनात घेण्यात आलेल्या निर्णयानुसार भारतीय मजदूर संघाने (भामसं) बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभर ‘सरकार जागे व्हा’ विरोध दिवस पाळणार आहे. या दिवशी सर्व राज्यांच्या जिल्हा मुख्यालयांवर धरणे, निदर्शने व आंदोलन करण्यात येणार असून कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारांचे लक्ष वेधण्यात येणार आहे. शासनाकडे वारंवार निवेदने देऊनही ठोस प्रतिसाद न मिळत नसल्याने हे अभियान राबविण्यात येत आहे, अशी माहिती विदर्भ प्रदेशाचे महामंत्री गजानन गटलेवार आणि हर्षल ठोंबरे यांनी सोमवारी दिली. अभियानांतर्गत बुधवारी संविधान चौक येथे दुपारी ३ वाजता कामगारांचे धरणे-निदर्शने होतील.








