संत गाडगेबाबा यांना अभिवादन

महाराष्ट्र टाइम्स

Sant Gadgebaba's birth anniversary was celebrated with great enthusiasm on Monday. Various political parties and organizations offered tributes. At the District Collector's office, Nayab Tehsildar Revannath Tathe paid floral tributes to Sant Gadgebaba's portrait. Municipal Corporation headquarters saw Mayor Sameer Rajurkar honoring the saint's image. Several officials and corporators were present at these events.

sant gadge baba jayanti celebrated with enthusiasm tribute programs at district collector office and municipal corporation

संत गाडगेबाबा यांची जयंती सोमवारी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. विविध पक्ष, संघटनांतर्फे जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नायब तहसीलदार रेवणनाथ ताठे यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

महापालिका मुख्यालयात महापौर समीर राजूरकर यांनी संत गाडगेमहाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी आयुक्त जी. श्रीकांत, नगरसेवक शिवाजी दांडगे, ऋषिकेश जैस्वाल, रामेश्वर भादवे, नगरसेविका सुनीता सोळुंके, कीर्ती शिंदे, करुणा जाधव, मोहन साळवे, माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद, रवींद्र खरात, अतुल बनकर, संतोष कोठाळे आदी उपस्थित होते.