हुबळी : प्रथमच रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या जम्मू काश्मीर संघाचा प्रवास म्हणजे चिकाटी आणि जिद्दीचे उदाहरण आहे. आज, मंगळवारपासून पुढील पाच दिवस त्यांचा पुन्हा कस लागणार आहे. कारण स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांचा सामना होईल तो कर्नाटकशी. आठवेळा रणजी जेतेपद पटकावणाऱ्या कर्नाटक संघात तारांकित खेळाडूंचा भरणा आहे. कर्नाटकने यंदा विविध परिस्थितीत अन् खेळाडूंच्या दुखापतींशी झुंज देत सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
केएल राहुल, करुण नायर, देवदत्त पडिक्कल आणि रविचंद्रन स्मरण सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. वेगवान गोलंदाज आकिब नबी जम्मू काश्मीरचा हुकमी एक्का आहे. नबीने या मोसमात ५५ विकेट टिपल्या आहेत. कर्नाटकचा लेग स्पिनर श्रेयस गोपाल याने ४६ फलंदाज बाद केले आहेत.
सामन्याची वेळ : सकाळी ९.३० पासून








