‘रेवा डायमंड’चा ‘आयपीओ’ आजपासून

महाराष्ट्र टाइम्स

Reva Diamond Jewellery's initial public offering begins today. The IPO is open for investment until Thursday. The company plans to use the funds to open fifteen new stores. A portion of the funds will support marketing for these new outlets. The remaining amount will be used for general corporate purposes.

reva diamond jewellery ipo opens today share price band 367 386 rs 380 crore issue

पुणे : ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’च्या ‘रेवा डायमंड ज्वेलरी’ची प्रारंभिक भागविक्री (आयपीओ) आज, मंगळवारपासून (२४ फेब्रुवारी) गुंतवणुकीसाठी सुरू होणार आहे.

३८० कोटी रुपयांचा हा ‘आयपीओ’ गुरुवारपर्यंत (२६ फेब्रुवारी) खुला राहील. हा पूर्णपणे ‘फ्रेश इश्यू’ (नवीन शेअरची विक्री) असून, यामध्ये ‘ऑफर-फॉर-सेल’चा कोणताही भाग असणार नाही.

कंपनी ‘आयपीओ’तून मिळणाऱ्या निधीचा मोठा हिस्सा १५ नवीन स्टोअर सुरू करण्यासाठी वापरण्याची योजना आखत आहे. ‘या निधीचा काही भाग या नवीन आउटलेट्सच्या मार्केटिंग आणि जाहिरातींसाठी राखून ठेवण्यात आला आहे. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरली जाईल. ‘आयपीओ’साठी प्रति समभाग ३६७ रुपये ते ३८६ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे,’ अशी माहिती सीईओ अमित मोडक यांनी दिली.