पल्लेकल : वर्ल्ड कप टी-२० क्रिकेट स्पर्धेतील सुपर आठ फेरीतील सामन्यात इंग्लंड आणि पाकिस्तान आज, मंगळवारी आमने-सामने येत आहे. खेळपट्टीचा नूर बघता फिरकी गोलंदाज निर्णायक ठरण्याची शक्यता जास्त आहे. इंग्लंडसाठी जमेची बाब म्हणजे या महिन्याच्या सुरुवातीला कॅँडी येथील या पल्लेकल स्टेडियमवर त्यांनी तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत धवल यश मिळवले आहे.
वर्ल्ड कप टी-२०मध्ये इंग्लंडला नमवणे अद्याप पाकिस्तानला जमलेले नाही. याआधीच्या तीन वर्ल्ड कप सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे.






