‘अजितदादा अंतःकरणापासून प्रेम करणारे माझे सच्चे मित्र होते. वक्तशीरपणा ही दादांची सर्वांत चांगली सवय. पण, दादांनी पहिल्यांदाच टायमिंग चुकवले. ते सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. अजितदादांच्या रुपात एक चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता’, अशा भावोत्कट उद्गारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत अजित पवार यांना शोकप्रस्तावावर श्रद्धांजली वाहताना दोन्ही सभागृहांतील सदस्यांना गहिवरून आले.
शोकप्रस्तावावर बोलताना मंत्री छगन भुजबळ, मंत्री अदिती तटकरे, शिवसेना (उबाठा) पक्षाचे भास्कर जाधव, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे रोहित पवार, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, आशीष शेलार, सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम यांच्यासह अनेकांना अश्रू अनावर झाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘यावर्षी दादांनी १२ वा अर्थसंकल्प मांडला असता. पुढच्या वर्षी १३ वा मांडून बॅ. शेषराव वानखेडे यांच्या विक्रमाची बरोबरी केली असती. वित्तविभागाने लाडकी बहीण योजनेचा भार पडेल असे म्हटले होते. पण (पान ६वर)






