पुणे : भूमी अभिलेख विभागाचे संचालक आणि जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांची राज्य सरकारने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या (यशदा) महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. दिवसे यांच्या जागी जमाबंदी आयुक्त म्हणून मसुरी येथील लालबहाद्दूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीचे (एलबीएसएनएनए) उपसंचालक असणारे शैलेश नवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. दिवसे पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी असताना गेल्या वर्षी दोन जानेवारीला त्यांची जमाबंदी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर सव्वावर्षाच्या कालावधीतच पुन्हा बदली करण्यात आली. दिवसे यांनी भूमी अभिलेख विभागात सातबारा आणि मालमत्ता पत्रकाच्या संगणकीकरणाला विशेष गती दिली होती.








