‘एल मेंचो’ ठार; मेक्सिकोत हिंसाचार

महाराष्ट्र टाइम्स

Mexican drug lord Nemesio Oseguera Cervantes, known as 'El Mencho' and head of the Jalisco New Generation Cartel, has been killed. This has triggered widespread violence across Mexico. Security forces faced multiple attacks, resulting in the deaths of 25 soldiers. Following his death, his associates initiated acts of arson and road blockades nationwide, disrupting normal life.

el mencho killed deadly violence in mexico after jalisco cartel chiefs death 25 soldiers slain

मेक्सिकोच्या गुन्हेगारीविश्वातील तस्कर, ‘ जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल ’चा म्होरक्या नेमेसिओ ऑसेग्वेरा कार्व्हन्टेस उर्फ ‘ एल मेंचो ’ लष्करी कारवाईत ठार झाल्यानंतर मेक्सिकोमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. मेक्सिकोच्या राष्ट्रीय सुरक्षा दलावरील सहा वेगवेगळ्या हल्ल्यांत २५ जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती संरक्षणमंत्री ओमर गार्सिया हार्फूच यांनी सोमवारी दिली.

कोकेनसह अमली पदार्थांची अमेरिकेत तस्करी करण्यात सहभाग असलेल्या ‘एल मेंचो’ याच्याविरोधात रविवारी लष्कराने मोहीम सुरू केली होती. त्याला ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात धुमश्चक्री उडाली. त्यात जखमी झालेल्या ‘ले मेंचो’ मृत्यू झाल्याचे सरकारने निवेदनात नमूद केले. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी सोमवारी देशभर हिंसाचार करून रस्ते राखणे, जाळपोळीचे प्रकार सुरू केले.

संबंधित वृत्त... ९