माजी केंद्रीय रेल्वेमंत्री व प. बंगालच्या राजकारणातील चाणक्य अशी ख्याती असणारे मुकुल रॉय यांचे रविवारी मध्यरात्री येथील एका खासगी रुग्णालयात हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते.
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर २०१७मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. कालांतराने ते पुन्हा ‘तृणमूल’मध्ये परतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी रॉय यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला आहे.
हृदयविकारासह अन्य काही आजारांनी ते दोन वर्षांपासून त्रस्त होते. या काळात त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल केले होते.






