श्री समर्थ सेवक मंडळाच्या सांस्कृतिक व संकीर्ण शाखेतर्फे दरवर्षी साजरा होणारा श्रीमत् दासनवमी उत्सवाचे यंदा १११वे वर्षे मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या उत्सवानिमित्त संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या निवडक गीतांचा ‘तो राजहंस एक’ हा संगीत कार्यक्रम आयोजित केला होता.
मंडळाचे विश्वस्त अनिल हजारे आणि निशिकांत साठे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या कार्यक्रमात पूर्वा आर्ते, मयूरी पुराणिक,मंजिरी प्रभू चैतन्य फाटक,मिलिंद दामले आणि रविंद्र कारेकर या गायक कलाकारांनी खळेकाकांच्या अजरामर रचनांचे अप्रतिम सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली.
समर्थ मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात ‘राजस सुकुमार’ या अभंगाने चैतन्य फाटक यांनी कार्यक्रमाची केली. त्यानंतर ‘बगळ्यांची माळ फुले’, ‘गेले ते दिन गेले’, ‘शुक्रतारा मंदवारा’ आदी गाणी सादर झाली. यावेळी राजन गोरे (तबला), शरद शिधये (सिंथेसायझर) आणि आर्यन पाटील (पखवाज ढोलकी व तालवाद्य) यांनी साथ केली. पूर्णिमा जोशी यांचे सूत्रसंचालन केले.






