विवाहितेचा छळ; जबरदस्तीने गर्भपात

महाराष्ट्र टाइम्स

A 33-year-old homemaker in Warje has filed a complaint against her husband and in-laws. She alleges prolonged mental and physical abuse. The complaint states she was given wrong medicines without her knowledge, leading to a forced abortion. Her family also demanded money and threatened to viral videos. Police have registered a case and begun an investigation.

harassment of married woman and forced abortion in pune case filed against husband motherinlaw brotherinlaw and two sistersinlaw

पती आणि सासरच्या मंडळींकडून दीर्घकाळ मानसिक व शारीरिक छळ आणि महिलेच्या नकळत चुकीची औषधे देऊन जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याच्या आरोपावरून पतीसह सासू, दीर व दोन जावांविरोधात तक्रार नोंदविण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

वारजे येथील एका ३३ वर्षीय गृहिणीने पोलिसांकडे वारजे माळवाडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पती अमित सुरेश शिंदे, सासू अरुणा शिंदे, दीर गौरव शिंदे, जाऊ श्रेया गौरव शिंदे व रुचिता सागर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विवाहानंतर सासरच्या मंडळींनी माहेरून मोठ्या रकमेची मागणी करून धमकावले. घरात कॅमेरे बसवून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली; तसेच स्त्रीधन गायब झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकारांमुळे आपल्याला जीवाला धोका असल्याची भावना तिने व्यक्त केली आहे.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, गरोदर असतानादेखील तिच्यावर मानसिक व शारीरिक छळ सुरूच होता. आजारी असताना पतीने चुकीची औषधे देऊन ती घेण्यास भाग पाडल्याचा आरोप तिने केला आहे. त्यानंतर रक्तस्राव झाल्याने रुग्णालयात तपासणी केली असता, गर्भपात झाल्याचे समोर आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, औषधांमुळे गर्भपात झाल्याचा संशय असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी पती, सासू, दीर व दोन जावांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू आहे.