पंचवटी : म्हसरूळ परिसरातील गुलमोहरनगर परिसरात काही दिवसांपासून टवाळखोरांनी उच्छाद मांडला आहे. रात्री मद्य आणि अमली पदार्थांचे सर्रास सेवन करून टोळक्यांकडून दहशत माजवली जात असल्याने येथील रहिवासी धास्तावले आहेत. नशेत असलेल्या तरुणांकडून मोठ्याने ओरडणे, शिवीगाळ करणे आणि अश्लील भाषेत संभाषण करण्याचे प्रकार घडत आहेत. महिलांना संध्याकाळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. गुलमोहरनगर, अभिषेक विहार परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली.






