अमरावती : धारणी तालुक्यातील शिवाझिरी घाटात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे. कांजोली येथील चार जणांचा रविवारी घटनास्थळीच मृत्यू झाला होता. गंभीर जखमी रिताबाई मंगल राठोड (४५) रा. शिनबन यांचा सोमवारी अमरावती येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील देडतलाई येथील आठवडी बाजार आटोपून कांजोलीकडे परतणाऱ्या पिकअप वाहनाचा शिवाझिरी घाटात अपघात झाला. वाहन दरीत कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली. या दुर्घटनेत दहाहून अधिक जखमी झाले.






