जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड विभागात गेल्या दीड वर्षापासून सुरक्षा दलांनी राबवलेल्या संयुक्त मोहिमेत जैश-ए-मोहम्मदच्या सात दहशतवाद्यांचा ‘ इस्रायल गट ’ उद्ध्वस्त करण्यात यश आले आहे. जम्मू विभागाचे पोलिस महानिरीक्षक भीमसेन तुती यांनी सोमवारी ही माहिती दिली.
सुरक्षा दलांनी रविवारी किश्तवाड जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांना ठार केले. त्यात जैश-ए-मोहम्मदच्या ‘इस्रायल गटा’चा कमांडर सैफुल्ला याचा समावेश आहे. ‘जैश’च्या सात दहशतवाद्यांनी एप्रिल २०२४मध्ये भारतात घुसखोरी केली होती. सुमारे दोन वर्षांपासून या गटाने १७ दहशतवादी कारवाया केल्या. गेल्या दीड वर्षात या दहशतवाद्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यात यश आले आहे. किश्तवाडमध्ये रविवारी सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत या गटाच्या तीन (पान ६वर)






