मेळघाटातील डॉक्टरांच्या राजीनाम्यावरून वाद

महाराष्ट्र टाइम्स

A doctor's resignation from a primary health center in Melghat has ignited a controversy. Dr. Shilpa Wankhade claims mental harassment led to her departure. The district health department refutes these allegations, stating she was provided accommodation and faced issues with local staff. The department claims she refused a transfer and remained absent without leave. Dr.

melghat doctor shilpa wankhades resignation major row over alleged mental harassment and mismanagement in health system

धारणी तालुक्यातील बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चाटवाबोड येथील आयुर्वेदिक दवाखान्यात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा वानखडे यांच्या राजीनाम्याने मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेत खळबळ उडाली आहे. मानसिक छळ सहन न झाल्याने आपण पदत्याग केल्याचा त्यांचा आरोप असताना जिल्हा आरोग्य विभागाने अधिकृत निवेदनातून हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. त्यामुळे प्रशासन आणि संबंधित डॉक्टर यांच्यातील संघर्ष उघड झाला आहे.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, जुलै २०२५मध्ये सेवेत रुजू झाल्यानंतर डॉ. वानखडे यांना शासकीय निवासस्थान देण्यात आले होते. काही दिवसांतच स्थानिक कर्मचाऱ्यांशी मतभेद निर्माण झाल्याच्या तक्रारी गावकऱ्यांकडून प्राप्त झाल्या. रुग्णसेवा बाधित होऊ नये म्हणून प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. धम्मदीप भगत यांनी मध्यस्थी केली, तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तिलोत्तमा वानखडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन संबंधितांना तोंडी सूचना दिल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. वाढत्या तणावामुळे त्यांना अन्य केंद्रावर बदलीचा पर्याय देण्यात आला; मात्र तो नाकारून त्या अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

दरम्यान, डॉ. वानखडे यांनी प्रशासनाचा खुलासा एकतर्फी असल्याचे सांगत तीव्र आक्षेप घेतला आहे. निवासस्थानाची दयनीय अवस्था, वीज-पाणीपुरवठा खंडित करणे, तसेच आरोग्यसेविका गायत्री उपराळे व कविता कोहळेकर यांच्या कार्यपद्धतीबाबत केलेल्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचा त्यांचा दावा आहे. गावकऱ्यांना आपल्या विरोधात प्रवृत्त केल्याचाही आरोप त्यांनी केला.