‘द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन हे ‘इंडिया’चे संयोजक म्हणून सर्वोत्तम आहेत. असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी सोमवारी व्यक्त केले. आघाडीतील एक छोटासा भागीदारही आघाडीच्या एकतेची खात्री देण्यास चांगला पर्याय ठरू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
स्टॅलिन सर्वोत्तम पर्याय आहेत, असे त्यांनुी म्हटले. अय्यर यांनी स्टॅलिन यांचे नाव वारंवार सुचविल्याने काँग्रेसमधून संताप व्यक्त होत आहे. स्टॅलिन यांना ‘इंडिया’चे राष्ट्रीय संयोजक किंवा अध्यक्ष पाहणे काँग्रेसच्या हिताचे असेल, असेही त्यांनी नमूद केले.






