रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष महोत्सवाअंतर्गत अंबरनाथ शहरातील महिलांसाठी मिसेस अंबरनाथ स्पर्धा होणार आहे. विविध वयोगटांमध्ये ही स्पर्धा होणार असून महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब मिडिया पार्टनर आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार, ७ मार्चला आणि अंतिम फेरी शनिवार, १४ मार्चला रोटरी सभागृह, वडवली, अंबरनाथ (पूर्व) येथे संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. २१ ते ४०, ४१ ते ६०, ६० वर्षांवरील आणि प्लस साईज ( २१ वर्षांवरील) अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क शंभर रूपये आहे. स्पर्धेत फक्त अंबरनाथ शहरातील महिला सहभागी होऊ शकणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी खालील लिंकवर नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांकावर चौकशी करावी, असे आवाहन संस्थेने केले आहे. https://docs.google.com/forms
/d/10g1WBqUFrMLBNHm
YJP9_ArDZPLsaPb3fXmwFg
VSM5s4
मोबाइल क्र. : ८१४९२६१८०३. ९८६७६५५००९.








