वाठोडा येथील तीनशे खाटांचे हॉस्पिटल : २०७ कोटी रुपये, मूलभूत सुविधांसाठी : १७० कोटी रुपये, दलित वस्ती सुधार : ४७ कोटी रुपये, दलितेतर सुधार योजना : ४० कोटी रुपये, महाज्योती संस्थेची प्रशासकीय इमारत : ७० कोटी रुपये, दिव्यांगांसाठीच्या योजना : १० कोटी रुपये, ओबीसी भवनाचे बांधकाम : २५ कोटी रुपये, छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, सभागृह : ३० कोटी रुपये, संत सावता महाराज सांस्कृतिक भवन : १६ कोटी रुपये, इंदोरा हॉस्पिटलचे बांधकाम : ७५ कोटी रुपये, विज्ञान केंद्राचा विकास : २० कोटी रुपये, विमानतळाजवळ विकास कामे : १३ कोटी रुपये, भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजना : ५० कोटी रुपये, शिवसृष्टी प्रकल्प : ३० कोटी रुपये (टोकन स्वरूपात), टेकडी गणपती मंदिर विकास : एक कोटी रुपये (टोकन स्वरूपात), इस्लामिक कल्चरल सेंटर : २.२१ कोटी रुपये, वारकरी भवन : ५.५० कोटी रुपये, तिरळे कुणबी भवन, खैरे कुणबी भवन : पाच कोटी रुपये, गोंड राजे समाधी स्थळ : सात कोटी रुपये, घरकुल प्रकल्प : ५० कोटी रुपये, विकासाची विविध कामे : ६५ कोटी रुपये, रस्त्यांचे डांबरीकरण, सिमेंट रस्ते : २५ कोटी रुपये, मोकळ्या जागांचे कुंपण : सात कोटी रुपये, हॉटमिक्स प्लान्ट : २० कोटी रुपये, दक्षिण नागपुरात कार पार्किंग : एक कोटी रुपये (टोकन स्वरूपात), भूसंपादनासाठी : ३० कोटी रुपये, पूर्व नागपुरात ई लायब्ररी : एक कोटी रुपयेेे
शहरातील नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणाऱ्या नागपूर सुधार प्रन्यासने विविध विकास प्रकल्पांसाठी भरीव तरतूद केली. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सादर झालेल्या १,५१४ कोटींच्या अर्थसंकल्पात मूलभूत सुविधांच्या विकासासाठी १७० कोटींची तरतूद करण्यात आली. गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात १०९ कोटींची वाढ झाली.
नासुप्रच्या सदर येथील नियोजन भवन येथे पार पडलेल्या बैठकीत २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. या सभेला सभापती संजय मीणा, नासुप्र, विश्वस्त आमदार कृष्णा खोपडे, नासुप्रचे, विश्वस्त संदीप इटकेलवार, अधीक्षक अभियंता प्रशांत भांडारकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलीन खडसे, कार्यकारी अधिकारी रसिका कवाडे, आस्थापन अधिकारी सुभाशिष डे, लेखा अधिकारी राजेश काथवटे आदी उपस्थित होते. मतदारसंघनिहाय पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी तरतूद करण्यात आली असल्याचे नासुप्रकडून सांगण्यात आले.






