पुणे : ‘भविष्यातील भूगोल समजण्यासाठी इतिहास मोलाचा असतो. ‘ यशोगाथा रामटेकडी इंडस्ट्रीज ’ ही यशोगाथा केवळ एका असोसिएशनपुरतीच मर्यादित नाही, तर भविष्यासाठी अनमोल दस्तावेज ठरेल. राज्यात आणि देशात नव्याने औद्योगिक वसाहत उभारताना यातील सर्व अनुभव, उद्योजकांना भेडवणाऱ्या समस्या उद्योजक आणि सरकारने नोंद घेण्याजोग्या आहेत,’ असे प्रतिपादन कुतवळ फूड्सचे मॅनेजिंग डायरेक्टर रामदास कुतवळ यांनी केले.
टेल्को मित्र परिवाराच्या पुढाकाराने उद्योजक हनुमंत तरटे लिखित ‘यशोगाथा रामटेकडी इंडस्ट्रीज’ची या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. आठवले फूड्सचे संचालक मिलिंद आठवले उपस्थित होते. सप्तसूर म्युझिक अकादमीचे संचालक योगेश जैन आणि गायिका समृद्धी शिंदे यांनी पूर्वार्धात गीते सादर केली. शेखर जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विजय नवले यांनी प्रास्ताविक केले.






