फुलंब्री : संत गाडगेबाबा जयंती किनगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका उत्कर्षा देशपांडे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी प्रा. मधुकर जाधव, प्रा. हनुमंत पाटील, प्रा. संदीप जावळे, बाळासाहेब शिंदे, शिक्षिका उज्ज्वला कोंडके, ज्येष्ठ नागरिक रामराव पाटील, जावेद शहा, दत्ता तावडे, रामभाऊ चव्हाण, प्रकाश साळवे, गणेश सोनवणे, कचरू देवकर, उत्तमराव चव्हाण व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
महाराजांना अभिवादन
फुलंब्री : येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना परिसरातील गिरजामाता प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे सोमवारी (२३ फेब्रुवारी) श्री संत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश टेकाळे यांनी केले. या वेळी श्री संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय मोरे यांनी पुष्पहार घालून केले. या वेळी मुख्याध्यापक विजय मोरे, लक्ष्मण पंडित, रामेश्वर बडक, दत्तू साळवे, मंगेश जाधव, गणेश लहाने, मंजू ठाकरे, प्रदीप कोलते, रमेश टेकाळे, बाळू मगरे, मनीषा शिंदे आदी उपस्थित होते.
प्रतिमेचे पूजन
फुलंब्री : येथील न्यू ओॲसिस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे राष्ट्रसंत गाडगेमहाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका करुणा दांडगे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. पृथ्वीवरील अंधश्रद्धा नष्ट झाली व परिसर स्वच्छ असला तर आपल्याला पृथ्वीवरच स्वर्ग पाहायला मिळेल, असे गाडगे महाराज म्हणायचे, असे दांडगे यांनी सांगितले. या प्रसंगी शिक्षिका स्वाती उंबरकर, संघप्रिया पैठणे, स्वाती खोजे, पूनम दांडगे, सपना सोनवणे, पूनम दाभाडे, इंदू जाधव, कोमल रेशवाल, प्रियांका गोरे, भाग्यश्री खिल्लारे, शिक्षक स्वप्नील बडक, रोशन ओइंबे, सोमनाथ भालेराव, रूपेश ठाकूर सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.








