‘ब्रह्मकुमारी’तर्फेप्रदर्शनाचे आयोजन

महाराष्ट्र टाइम्स

Brahmakumari organized an exhibition in Pune to mark the 90th Mahashivratri. The event's highlight was the 'Sahasra Shivling Darshan'. Attendees received guidance on achieving peace of mind, positive thinking, and boosting morale. The exhibition saw participation from students and teachers of Prism Foundation School and E-Learning School. Local dignitaries also attended the program.

sahasra shivalinga darshan exhibition by brahma kumaris in pune promoting peace of mind and positive thinking

पुणे : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे ९०व्या महाशिवरात्री पर्वाचे औचित्य साधून नुकतेच प्रदर्शनाचे आयोजन केले होते. ‘ सहस्र शिवलिंग दर्शन ’ हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले.

प्रभात रस्ता परिसरात आयोजित या कार्यक्रमात मनःशांती, सकारात्मक चिंतन आणि मनोबल कसे वाढवावे, यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी नगरसेविका मिताली सावळेकर आणि भाजपचे पदाधिकारी गिरीश खत्री उपस्थित होते. या प्रदर्शनाला प्रीझम फाउंडेशन स्कूलचे ४० विद्यार्थी आणि दहा शिक्षक उपस्थित होते. ई-लर्निंग स्कूलचे ६० विद्यार्थी आणि सहा शिक्षकही आवर्जून उपस्थित होते.