पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पवार यांनी द्रव पदार्थ आणि हलका आहार घेण्यास सुरुवात केली आहे. सर्व तपासण्या सामान्य असून, प्रकृती स्थिर आहे,’ अशी माहिती ‘रुबी हॉल क्लिनिक’चे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट यांनी दिली.
‘पूर्ण बरे होण्यासाठी आणि पुरेशा विश्रांतीसाठी पवार यांना पुढील दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे,’ असेही डॉ. ग्रँट यांनी सांगितले.
पवार यांना सौम्य स्वरूपात डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.






