एक्सलेंटच्या संचालकासह आणखी दोघे गजाआड

महाराष्ट्र टाइम्स

Police have arrested the director of Excellent Academy, Mustafa Khan, along with two others in the St. Ursula paper leak case. This brings the total arrests to four. The leak involved a chemistry paper and its answers found on a student's mobile. Investigations are ongoing to identify the source of the leak, with a focus on school principals and teachers.

st ursula paper leak scam excellent academy director mustafa khan among four arrested

सेंट उर्सुला पेपरफूट प्रकरणात सदर पोलिसांनी एक्सलेंट अकादमी या शिकवणी वर्गाच्या संचालकासह आणखी दोघांना अटक केली.

मुस्तफा खान मुनीर खान (वय ४२, रा. भानखेडा, तहसील), जुनैद मोहम्मद अब्दुल जावेद (वय २०, रा. हसनबाग, नंदनवन), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी रविवारी निशिकांत सुखदेव मूल (वय ४०, रा. मानकापूर) व फरहान अख्तर फहीम अख्तर (वय १८, रा. ऑटोमोटिव्ह चौक, कपिलनगर) या दोघांना अटक केली होती. मूल हा खासगी शिकवणी वर्ग चालवितो. या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या आता चार झाली आहे. बुधवारी एका विद्यार्थिनीकडे आढळलेल्या मोबाइलमधील व्हॉट्सॲपवर रसायनशास्त्राचा पेपर व त्याची उत्तरे आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. व्हॉट्सॲप ग्रुपच्या आधारे पोलिसांनी मूल व फरहान या दोघांना अटक केली. दोघांची २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी घेतली.

मुस्तफा हा एक्सलेंट अकादमी चालवित असून, त्याचे अनेक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांसोबत संबंध आहेत. या मुख्याध्यापक व शिक्षकांपैकी एकाने परीक्षेच्या अर्ध्या तासापूर्वी पेपर हा व्हॉट्सॲपवर पोस्ट केला. त्यानंतर तो व्हायरल होऊन विविध ग्रुपवर आला. अशाच प्रकारच्या एका ग्रुपमध्ये पेपर दिसला. त्यामुळे फरहान व जुनैद या दोघांनी तो संबंधित ग्रुपवर व्हायरल केला. या प्रकरणात ग्रुप टू ग्रुप तपासण्यात येत आहेत. त्यांच्या सदस्यांची चौकशी केल्यानंतर नेमका कोणी पेपर फोडला. यात मुख्याध्यापक अथवा शिक्षकाचा सहभाग आहे किंवा नाही, हे चौकशीनंतर स्पष्ट होईल, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.