‘ट्रॅफिक्युअर’ ॲपद्वारेकोंडीचे व्यवस्थापन

Contributed byअतिरिक्त पोलिस आयुक्त|महाराष्ट्र टाइम्स

Pune City Traffic Police have launched 'Trafficure', a new software developed with Google Maps. This system predicts and manages traffic jams in real-time. It helps traffic police respond quickly to congestion points. The software analyzes traffic data to improve vehicle speed. This initiative aims to make city traffic smoother and more efficient for commuters.

trafficure app to control traffic congestion in pune real time management with the help of google maps

शहरातील वाहतूक कोंडी आणि मंदगतीचा वेळीच अंदाज घेऊन व्यवस्थापन प्रभावी करण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी ‘गुगल मॅप’च्या साह्याने ‘ट्रॅफिक्युअर’ हे अत्याधुनिक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. लेफ्टन इंडिया आणि पुणे शहर वाहतूक विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने ही प्रणाली तयार करण्यात आली आहे.

या सॉफ्टवेअरद्वारे शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि मंदगतीची माहिती प्रत्यक्ष वेळेत उपलब्ध होणार आहे. स्वतंत्र ॲलर्ट प्रणालीमुळे संबंधित ठिकाणी वाहतूक पोलिस तत्काळ पोहोचून कोंडी निवारणाची कारवाई अधिक प्रभावीपणे करू शकणार आहेत.

प्रमुख रस्त्यांवर ५५०पेक्षा अधिक विभाग तयार करून त्या आधारे वाहतूक परिस्थितीचे निरीक्षण करण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर जानेवारी ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत केलेल्या अभ्यासानुसार, वाहनांचा सरासरी वेग २६.८ किमी प्रतितास नोंदविण्यात आला. याच्या मदतीने प्रत्येक विभागाचा पूर्वीचा डेटा पडताळून वाहतूक कोंडीची कारणे शोधून वाहनांचा वेग वाढविण्यासाठी उपाययोजना करता येणार आहेत.

या उपक्रमाचे सविस्तर सादरीकरण पोलिस आयुक्त अमितेशकुमार आणि सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या उपस्थितीत पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील सिंडिकेट हॉलमध्ये करण्यात आले.