शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेद्वारे २०२५-२६मध्ये केलेल्या बाह्य मूल्यांकनात, विद्याभवन प्राथमिक मराठी आणि विद्याभवन प्राथमिक इंग्लिश या शाळांना ‘ए प्लस’ मानांकन जाहीर करण्यात आले आहे.
विद्याभवन शिक्षण संकुलाने गेल्याच वर्षी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या शासकीय उपक्रमात ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे अकरा लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले होते. तर विद्याभवनच्या या रौप्यमहोत्सवी वर्षात दोन शाळांना ए प्लस श्रेणी लाभली आहे हे विशेष महत्त्वाचे, असे शाळा व्यवस्थापनाने म्हटले आहे.






