मुंबई महापालिकेतील विविध समित्यांवर अध्यक्ष, सदस्यांची निवड झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवकपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. यामध्ये आपल्या नातेवाइकांना स्थान मिळण्यासाठी काही नेत्यांची धडपड सुरू आहे. भाजप आमदार राजहंस सिंह यांचे पुत्र नितेश सिंह , शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. यासाठी त्यांनी अर्जही दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
येत्या २५ फेब्रुवारीला महापालिका सभा असून यामध्ये स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. दहा स्वीकृत सदस्यांची निवड झाल्यावर विद्यमान नगरसेवकांची संख्या २२७वरून २३७ होईल. स्वीकृत नगरसेवक सदस्यपदासाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत. त्यातील काही नावांवर शिक्कामोर्तबही झाल्याची माहिती आहे. भाजपकडून माजी नगरसेवक प्रवीण छेडा, प्रतिप कर्पे, कमलाकर दळवी यांना संधी दिली जात असून भाजप आमदार राजहंस सिंह यांचे पुत्र नितेश सिंह यांचीही वर्णी लागणार असल्याचे समजते. शिवसेना (उबाठा) पक्षाकडून कैलास पाठक, माधुरी मांजरेकर आणि साईनाथ दुर्गे यांची नावे आघाडीवर आहेत. महापालिका निवडणुकांच्या वेळी माधुरी मांजरेकर यांना वडाळा येथील प्रभाग क्रमांक १७८मधून शेवटच्या क्षणी तिकीट नाकारण्यात आले होते. काँग्रेसकडून (पान ६वर)






