‘शेतकरी हाच तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू’

महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra aims to lead India in agriculture by integrating modern technology with farmers' traditional knowledge. The state has launched an AI-based agriculture policy for 2025-2029, allocating 500 crore rupees. The 'Mahavistar' app provides personalized advice, market rates, and weather information in local languages. Over 30 lakh farmers have downloaded the app, enhancing agricultural practices across the state.

with ai drones and iot maharashtra farmers to become smart 500 crore ai based agriculture policy announced

कृषी क्षेत्राच्या तंत्रज्ञानात शेतकरी हाच केंद्रबिंदू असला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, आयओटी यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाला शेतकऱ्यांच्या पारंपरिक ज्ञानाशी जोडल्यास महाराष्ट्राची शेती देशासह जगासाठी आदर्श ठरू शकते, असा विश्वास कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. कृषिमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राने २०२५ ते २०२९ या कालावधीसाठी एआय आधारित कृषी धोरण राबवून देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यासाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे. ‘महाविस्तार’ अ ॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत वैयक्तिक सल्ला, बाजारभाव, हवामान माहिती आणि विविध योजनांचे मार्गदर्शन केले जात आहे. आतापर्यंत ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी हे अ ॅप डाउनलोड केले आहे.