Tariff Concerns Lead To A Significant Drop In The Indian Stock Market
टेरिफ चिंतेने बाजार घसरले
महाराष्ट्र टाइम्स•
जागतिक टेरिफ चिंतेमुळे शेअर बाजारात घसरण झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अँड टी आणि भारती एअरटेल सारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सची विक्री झाली. सेन्सेक्स २५० अंकांनी घसरून ८३,६२७ वर बंद झाला. निफ्टी ५७ अंकांनी घसरून २५,७३२ वर स्थिरावला. काही कंपन्यांचे शेअर्स वाढले तर काही घटले. ब्रेन्ट क्रूडचा दर वाढला.
जागतिक स्तरावरील व्यापार युद्धाच्या चिंतेमुळे आणि रिलायन्स इंडस्ट्रीज , एल अँड टी, भारती एअरटेल यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री झाल्यामुळे मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. ‘सेन्सेक्स’ २५०.४८ अंकांनी घसरून ८३,६२७.६९ वर बंद झाला, तर व्यवहारादरम्यान तो ६१५.३८ अंकांनी खाली येऊन ८३,२६२.७९ पर्यंत पोहोचला होता. ‘ निफ्टी ’ ५७.९५ अंकांनी घसरून २५,७३२.३० वर स्थिरावला.
या घसरणीत सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३० कंपन्यांपैकी ट्रेंट, लार्सन अँड टूब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडिगो, मारुती, आयटीसी, अदानी पोर्ट्स आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपन्यांचे शेअर्स खाली आले. मात्र, इटर्नल, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, भारतीय स्टेट बँक आणि टीसीएस या कंपन्यांचे शेअर्स मात्र वधारले. दरम्यान, जागतिक तेल बाजारात ब्रेन्ट क्रूडचा वायदा दर प्रतिबॅरल १.८६ टक्क्यांनी वाढून ६५.०६ डॉलरवर पोहोचला.