‘बीएआय’ पुरस्काराचे वितरण उत्साहात

महाराष्ट्र टाइम्स

The Builders Association of India, Pune Center, recently held its 29th BAI-Shirke Well Built Structure Competition awards. Rohidas alias Dadsaheb More received the BAI-Padmashree B. G. Shirke Lifetime Achievement Award. He donated the prize money for the education of construction workers' children. Special Inspector General of Police Dr.

bai shirke well built structure award distribution in pune amid enthusiasm

पुणे : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे केंद्र आयोजित आणि बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड प्रायोजित २९वा ‘बीएआय-शिर्के वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन २०२५’ पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला.

यंदा ‘बीएआय-पद्मश्री बी. जी. शिर्के जीवनगौरव पुरस्कार’ ( निर्माणरत्न २०२५ ) युनिव्हर्सल ग्रुपचे संस्थापक रोहिदास ऊर्फ दादासाहेब मोरे यांना प्रदान करण्यात आला. मोरे यांनी पुरस्काराची एक लाख ११ हजार रुपयांची रक्कम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक मदत करण्यासाठी ‘बीएआय’कडे सुपूर्द केली. गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. राजेंद्र डहाळे, ऑल इंडिया ‘बीएआय’चे माजी अध्यक्ष आर. राधाकृष्णन, बी. जी. शिर्के कंपनीचे उपाध्यक्ष आर. बी. सूर्यवंशी, ‘बीएआय’ महाराष्ट्राचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव, बीएआय पुणे केंद्राचे अध्यक्ष अजय गुजर, ‘डब्ल्यूबीएससी’चे अध्यक्ष सुनील मते आदी या वेळी उपस्थित होते.

‘देशाच्या पायाभूत विकासामध्ये स्थापत्य अभियंते, वास्तुविशारद आणि बांधकाम व्यावसायिकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. बदलत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून बांधकाम क्षेत्राची गुणवत्ता व सुरक्षितता वाढविण्याला प्राधान्य द्यावे,’ असे प्रतिपादन गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. राजेंद्र डहाळे यांनी केले. प्रास्ताविक अजय गुजर, सूत्रसंचालन एकता कपूर आणि संजय आपटे यांनी केले. सी. एच. रतलानी यांनी आभार मानले. ‘वेल बिल्ट स्ट्रक्चर’ स्पर्धेत विविध बांधकाम व्यावसायिकांना या वेळी गौरविण्यात आले.