टँकर अपघाताचे विधानसभेत पडसाद

महाराष्ट्र टाइम्स

A recent tanker accident on the Mumbai-Pune Expressway caused significant disruption. The incident prompted discussions in the Maharashtra Assembly. Chief Minister Devendra Fadnavis announced a new traffic management system for the expressway. Companies transporting hazardous materials will now develop standard operating procedures. Future testing will explore airlifting such tankers after accidents.

tanker accident echoes in assembly fadnavis orders sop traffic management and airlift test

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर काही दिवसांपूर्वी झालेल्या टँकर अपघाताचे पडसाद शनिवारी विधानसभेत उमटले. त्यानंतर याची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, महामार्गावर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली.

अशा प्रकारच्या ज्वलनशील पदार्थांच्या वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाल्यास पुढे कोणतीही कार्यवाही करायची या संदर्भात एसओपी (प्रमाणित कार्यपद्धती) तयार करण्याची सूचना संबंधित कंपन्यांना करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, भविष्यात अशा प्रकारच्या अपघातानंतर संबंधित टँकरला एअरलिफ्ट करता येऊ शकते का, याची चाचणी ‘एमएसआरडीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

मुंबई-पुणे महामार्गावर काही दिवसांपूर्वी प्रोपेलिन या ज्वलनशील वायूचा टँकर उलटल्याने जवळपास दोन दिवसांहून अधिक काळ महामार्ग ठप्प झाला. याबाबत आमदार चेतन तुपे, अमित साटम यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी ‘हॅजमॅट व्हेइकल’ (धोकादायक पदार्थ नेणारे वाहन) युनिट; तसेच अग्निशमन युनिट उभारण्याची मागणी केली.