छत्रपती संभाजीनगर : जुन्या वादाच्या कारणावरून; तसेच पोलिसांकडे तक्रार का केली, या कारणावरून आनंदनगर भागात राहणाऱ्या शेजाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणात एकमेकांवर चाकू हल्ला करण्यात आला; तसेच लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. ही घटना २६ फेब्रुवारी रोजी आनंदनगर भागात घडली. या दोन्ही प्रकरणात परस्पर विरोधी तक्रारीवरून आठ जणांच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यात रामनाथ बंडू भोजने (वय ५५) यांनी तक्रार दिली आहे; तर याच्या विरोधात ज्योती वाघमारे (वय ३३, रा. पुंडलिकनगर) यांनी तक्रार दिली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कोळेकर हे करीत आहेत.








