राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण केले. विविध प्रयोग, चार्ट्सच्या माध्यमातून विज्ञानातील संकल्पना प्रभावीपणे सादर केल्या. प्रत्यक्ष प्रयोगातून कार्यकारणभाव स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
पी. यू. जैन माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शन व मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी सहभाग घेतला. प्रदर्शनात इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यरत मॉडेल्स, चार्ट्स व प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञानातील संकल्पना प्रभावीपणे सादर केल्या. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रयोग करून कार्यकारणभाव स्पष्ट करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तसेच पुस्तक प्रदर्शन, कार्यानुभव प्रकल्प, विविध हस्तकला वस्तू आणि रांगोळीतून विज्ञान आकृत्यांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले.
उद्योजक कमल पहाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुनील सेठी, सुनील अजमेरा, सावन चुडीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक मुख्याध्यापक विजय पाटोदी यांनी केले. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कविता ठोले, ज्येष्ठ शिक्षिका सुवर्णा शहा, उषा पांडे, विज्ञान शिक्षिका दर्शना पाटणी, शीतल ठोळे, मयूर गंगवाल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दर्शना पाटणी यांनी केले. रचना कासलीवाल यांनी विज्ञान गीत सादर केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विशाल पाटणी, महावीर सांगवे, प्रियंका कासलीवाल आदींनी परिश्रम घेतले.








