भाषा आणि संस्कृती अविभाज्य

महाराष्ट्र टाइम्स

Marathi language and culture are vital and inseparable. This was emphasized at an international seminar where Marathi individuals shared their experiences abroad. Participants discussed preserving traditions and language in countries like Singapore and Hong Kong. Events celebrating Marathi festivals are regularly organized. Local populations show interest in Marathi culture and cuisine. Online cooking competitions for children received a good response.

भाषा आणि संस्कृती अविभाज्य
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

भाषा आणि संस्कृती या एकमेकांपासून वेगळ्या करता येत नाहीत. देश-विदेशात वास्तव्यास असताना आपली भाषा व संस्कृती विसरून चालणार नाही, असा सूर आंतरराष्ट्रीय मराठी मंच आयोजित परिसंवादात उमटला. रावसाहेब थोरात सभागृहात शनिवारी (दि. २८) झालेल्या या कार्यक्रमात विविध देशांत कार्यरत असलेल्या मराठी बांधवांनी आपले अनुभव मांडले.

परिसंवादात ठाण्याच्या मेघना साने यांनी संवादकाची भूमिका पार पाडली. सिंगापूर येथील सचिन गांजापूरकर म्हणाले की, सिंगापूरमध्ये सध्या ३९ ढोलपथके कार्यरत आहेत. चिनी नागरिकांनाही मराठी संस्कृतीबद्दल विशेष आकर्षण असून सहावारी व नऊवारी साडी कशी नेसतात, याबाबत ते नेहमी उत्सुकता दाखवतात. सिंगापूरमध्ये चित्रकला, शिल्पकला, नृत्य, नाट्य अशा विविध कलाविषयक उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते. सुमारे साडेतीन हजार मराठी पुस्तके तेथे उपलब्ध असून त्यांची देवाण-घेवाण नियमितपणे होत असते. हाँगकाँग येथील मनोज कुलकर्णी म्हणाले की, पूर्वी मराठी पदार्थांची कमतरता होती; मात्र आता साबुदाणा वडा, साबुदाण्याची खिचडी, कोथिंबीर वडी यांसारखे पदार्थ तेथे उपलब्ध झाले आहेत आणि स्थानिक लोकही ते आवडीने खातात. मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन पाककृती स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. अफ्रिकेतील राहुल उरणकर म्हणाले की, दरवर्षी गुढीपाडवा, दिवाळी, गणेशोत्सव, महाराष्ट्र दिन, शिवजयंती अशा १८ कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, याकडे लक्ष वेधले.