बांगलादेश लीग संकटात

महाराष्ट्र टाइम्स

बांगलादेश क्रिकेटपटूंनी नझमुल इस्लाम यांच्यावर केलेल्या अवमानामुळे बांगलादेश प्रीमिअर लीगवर बहिष्कार टाकला आहे. खेळाडूंचा स्वाभिमान जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नझमुल इस्लाम यांनी खेळाडूंच्या मानधनाबाबत आक्षेपार्ह भाष्य केले होते. या बहिष्कारामुळे ढाका क्रिकेट लीग आणि बांगलादेश प्रीमिअर लीगच्या अनेक लढती लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. नझमुल इस्लाम यांना हटवण्याची मागणी खेळाडूंची आहे.

बांगलादेश लीग संकटात
बांगलादेश क्रिकेटपटूंनी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकल्यास खेळाडूंचे नुकसान होईल, असे विधान करणाऱ्या नझमुल इस्लाम यांना हटवण्याच्या मागणीसाठी बांगलादेश प्रीमिअर लीगवर (BPL) बहिष्कार टाकला आहे. नझमुल यांना दूर केल्यानंतरही खेळाडू लीग खेळण्यास तयार नाहीत. खेळाडूंचा अवमान आणि मानधनाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे हा बहिष्कार केवळ लीगपुरता मर्यादित नसून, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आयोजित केलेले सर्व सामने रोखण्यात आले आहेत. यामुळे ढाका क्रिकेट लीग आणि BPL मधील अनेक सामने पुढे ढकलण्यात आले आहेत.

नझमुल इस्लाम यांनी बुधवारी टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेवर बांगलादेशने बहिष्कार घातल्यास खेळाडूंचेच नुकसान होईल, बोर्डाचे नाही, असे म्हटले होते. त्यांनी असेही स्पष्ट केले होते की, बांगलादेश बोर्डाला आयसीसीकडून स्पर्धेसाठी मिळणारी रक्कम कोणत्याही परिस्थितीत मिळणार आहे. मात्र, खेळाडूंना त्यांचे मानधन आणि वैयक्तिक पारितोषिके गमवावी लागतील, असे त्यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर, बांगलादेशने बहिष्कार घातल्यास खेळाडूंना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतातील सामने अन्यत्र खेळवण्याच्या मुद्द्यावरून बांगलादेश क्रिकेट बोर्ड आक्रमक भूमिका घेत आहे. मात्र, त्याच वेळी त्यांना खेळाडूंच्या बंडाचा सामना करावा लागत आहे. सातत्याने खेळाडूंचा अवमान करणाऱ्या नझमुल इस्लाम यांना हटवण्याच्या मागणीसाठी खेळाडूंनी बांगलादेश प्रीमिअर लीगवर बहिष्कार टाकला होता. आता नझमुल यांना पदावरून दूर केल्यानंतरही खेळाडू लीग खेळण्याची ग्वाही देण्यास तयार नाहीत.

बांगलादेशच्या क्रिकेटपटूंचा बहिष्कार केवळ लीगपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्ड घेत असलेले सर्व सामने रोखले आहेत. यामुळे गुरुवारी ढाका क्रिकेट लीगमधील चार आणि बांगलादेश प्रीमिअर लीगमधील दोन लढती लांबणीवर टाकण्यात आल्याची घोषणा बांगलादेश क्रिकेट बोर्डास करावी लागली. नझमुल राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत सामन्यांवरील बहिष्कार कायम राहील, असे बांगलादेश क्रिकेटपटू संघटनेने गुरुवारी सकाळी स्पष्ट केले होते.

ढाका क्रिकेट लीगमधील सामन्यांसाठी खेळाडू मैदानावर उतरले नाहीत, हे पाहिल्यावर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने नझमुल इस्लाम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यांना ४८ तासांत उत्तर देण्यास सांगितले होते. मात्र, बांगलादेश प्रीमिअर लीगमधील चट्टोग्राम रॉयल्स आणि नोखाली एक्सप्रेस यांच्यातील तसेच राजशाही वॉरियर्स आणि सिल्हेट टायटन्स यांच्यातील सामन्यांसाठी खेळाडू मैदानात उतरले नाहीत. त्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने वित्त समितीचे अध्यक्ष नझमुल यांना दूर करण्यात आल्याची घोषणा केली. तरीही, खेळाडूंनी लीग सुरू करण्याचे आश्वासन दिलेले नाही.

"आम्ही खेळाडूंचा स्वाभिमान जपण्यासाठीच हा बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय क्रिकेटशी संबंधित प्रत्येकाचे हित लक्षात घेऊनच घेतला होता. नझमुल सातत्याने क्रिकेटपटूंचा अपमान करीत आहेत. ते खेळाडूंच्या मानधनाबाबत आक्षेपार्ह भाष्य करीत आहेत," असे क्रिकेटपटूंनी सांगितले.