Body Of Security Guard Found In Lonavala Under Landslide Debris
सुरक्षारक्षकाचा मृतदेह आढळला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
लोणावळा : जुना खंडाळ्यातील डोंगरावर असलेल्या रस्टिक आयलँड नॉर्थ पॉइंट व ३६० सर्कल या उच्चभ्रू परिसरात दरडीच्या ढिगाऱ्याखाली मंगळवारी एका सुरक्षारक्षकाचा मृतदेह आढळला .
या भागात सोमवारी पहाटे दरड कोसळली होती. दरडीखाली सुरक्षारक्षक ांची केबिन गाडली गेली. त्यानंतर दोन सुरक्षारक्षक बेपत्ता झाले होते. यातील गंगाराम पुत्तेपु होय (वय ४०, मूळ निजामाबाद, तेलंगण) या सुरक्षारक्षकाचा मृतदेह मंगळवारी सापडला. प्रमोद शांताराम प्रजापती हा सुरक्षारक्षक अद्याप बेपत्ता आहे.दरड कोसळल्यानंतर परिसरातून १४ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते. या दोन्ही बेपत्ता व्यक्तींच्या शोध घेण्यासाठी पीएमआरडी, लोणावळा नगरपरिषद आणि लोणावळा शहर पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली होती.