Work From Home Scam Leads To Fraud Of 40 Lakhs In Pune
‘वर्क फ्रॉम होम’च्याआमिषाने फसवणूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पुणे : घरबसल्या रेस्टॉरंटला ऑनलाइन रिव्ह्यू देण्याचे काम आणि त्यातून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका ४६ वर्षीय व्यक्तीची ३९ लाख ७९ हजार १५२ रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाइलधारक आणि बँक खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हांडेवाडी परिसरात राहतात. १९ ते २५ सप्टेंबर २०२५दरम्यान सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी टेलिग्रामद्वारेे संपर्क साधला. रेस्टॉरंटला ऑनलाइन रिव्ह्यू दिल्यास नफा मिळेल आणि हे काम घरबसल्या करता येईल, असे सांगून तक्रारदारांना गंडा घातला.