‘रक्षा पेन्शन समाधान’उपक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
rakhsha pension samadhan initiative in pune a chance and convenience for pensioners
पुणे : संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण लेखा विभागातर्फे १९९वे ‘ रक्षा पेन्शन समाधान आयोजन २०२६’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम १७ आणि १८ जुलै रोजी खडकी येथील बीईजी सेंटर येथे होणार आहे. संरक्षण पेन्शनधारक आणि कौटुंबिक पेन्शनधारकांच्या विविध पेन्शनविषयक अडचणींचे निराकरण तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

हा उपक्रम १७ जुलै रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी पाच आणि १८ जुलै रोजी सकाळी ९.३० ते दुपारी एक या वेळेत आयोजिण्यात आला आहे. या आयोजनादरम्यान संरक्षण पेन्शनधारकांना विविध सेवा एकाच ठिकाणी मिळतील. त्यात पेन्शनविषयक सेवा विनंत्या स्वीकारणे, प्रलंबित तक्रारींचे निराकरण, वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करणे, पेन्शनधारकांच्या माहितीची पडताळणी, आधार क्रमांक, पॅन क्रमांक, टपाल पत्ता आदी माहिती अद्ययावत करणे; तसेच स्पर्श पीपीओ, सुधारित पीपीओ, पेन्शन पर्ची, फॉर्म-१६ आणि इतर पेन्शनसंबंधित सेवांचा समावेश आहे.