‘पारंपरिक शिक्षणाचीगरज उरणार नाही’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
the need for traditional education will fade away experts prediction
पुणे : ज्ञानप्राप्तीसाठी ‘एआय चॅट बॉक्स’ प्रभावी ठरत आहे. त्यामुळे काही वर्षांनंतर शिक्षणासाठी पारंपरिक शिक्षण आवश्यक राहणार नाही, अशी परिस्थिती असल्याचे मत संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले. ‘रिजनल ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग असोसिएशन’च्या (रामा) विशेष सभेत डॉ. शिकारपूर बोलत होते. ‘रामा’चे अध्यक्ष दिनकर शिलेदार, रिव्हेल ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रातील उद्योजक महेश घोरपडे आदी या वेळी उपस्थित होते.