Significant Agreement For Public Policy And Good Governance
सार्वजनिक धोरण,सुशासनासाठी करार
महाराष्ट्र टाइम्स•
सार्वजनिक धोरण , सुशासन , धोरण संशोधन आणि संस्थात्मक क्षमता वृद्धी या क्षेत्रांमध्ये संयुक्तपणे काम करण्यासाठी गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था आणि धोरणात्मक सल्लागार क्षेत्रात कार्यरत कन्सल्ट कोमल या संस्थांमध्ये करार करण्यात आला.
या माध्यमातून पुराव्यांवर आधारित धोरणनिर्मिती, संस्थात्मक बळकटीकरण आणि सार्वजनिक क्षेत्रातील ज्ञाननिर्मितीला चालना देण्याचा दोन्ही संस्थांचा उद्देश आहे. या भागीदारीअंतर्गत सार्वजनिक धोरण संशोधन, विविध योजनांचे मूल्यमापन, कार्यकारी शिक्षण, क्षमता विकास कार्यक्रम, ज्ञानविषयक प्रकाशने तसेच सार्वजनिक धोरणांवरील चर्चासत्रे आणि संवाद कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित करण्यात येणार आहेत.गोखले संस्थेचे कुलगुरू प्रा. उमाकांत दाश, ‘कन्सल्ट कोमल’च्या संस्थापक, प्रमुख सल्लागार कोमल गुप्ता आदी उपस्थित होते.