दीनानाथ रुग्णालयातउपचार मार्गदर्शन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
dinannath hospital conducts life saving workshop for pregnant women
पुणे : गर्भवतीचे हृदय अचानक बंद पडल्यास आई आणि बाळाचे प्राण वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या उपचारांचा सराव करण्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ‘कोड टू सेव्हिंग टू लाइव्ह्स’ ही सिम्युलेशन आधारित कार्यशाळा झाली. नॅशनल निओनॅटॉलॉजी फोरम (एनएनएफ) महाराष्ट्र शाखा आणि पुणे ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात होते.

कार्यशाळेत प्रसूती व स्त्रीरोग, नवजात अर्भक, आपत्कालीन, अतिदक्षता आणि सिम्युलेशन विभागातील डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी सहभागी झाले. गर्भवतीचे अचानक हृदय बंद पडल्यास सर्वप्रथम ‘कार्डिओपल्मनरी रिससिटेशन’ (सीपीआर) सुरू करणे आवश्यक असते. मात्र, मोजक्या काही मिनिटांत आईचे रक्ताभिसरण पूर्ववत झाले नाही, तर शक्य तितक्या लवकर प्रसूती करणे आवश्यक ठरते. ‘रिससिटेटिव्ह हिस्टेरोटॉमी’ या जीव वाचविणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे आई आणि बाळाचा जीव वाचण्याची शक्यता वाढते, असे या वेळी तज्ज्ञांनी सांगितले.
सीपीआर, तातडीचे उपचार आणि आवश्यक असल्यास ‘रिससिटेटिव्ह हिस्टेरोटॉमी’ करण्याचा सराव कार्यशाळेत करण्यात आला. प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. माधवी बहुलीकर यांनी अशा प्रसंगी तज्ज्ञांचा समन्वय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. डॉ. शिल्पा कलाने, डॉ. वैभवी उपाध्ये यांनीही मार्गदर्शन केले.