मॅक्रॉन यांच्या दौऱ्यावेळीच सीरिया स्फोटाने हादरले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
दमास्कस : सीरियाच्या दमास्कसमध्ये मंगळवारी झालेल्या स्फोटांमुळे शहर हादरले. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन एका महत्त्वपूर्ण दौऱ्यावर असताना आणि सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेत असतानाच हे स्फोट झाले; यात किमान १८ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती सीरियाच्या गृहमंत्रालयाने दिली. मॅक्रॉन हे सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शारा यांची भेट घेण्यासाठी राष्ट्राध्यक्ष भवनात दाखल झाले होते, त्याच वेळी ‘फोर सीझन्स हॉटेल’जवळ हे स्फोट झाले.