Pedestrian Woman Dies In Motorcycle Accident Critically Injured
दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पुणे : टिळक रस्त्यावर भरधाव दुचाकीच्या धडकेत एका अनोळखी पादचारी महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक प्रवीण माने यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी सांगितले, की रविवारी (पाच जुलै) पहाटे पाचच्या सुमारास संबंधित महिला विजय सेल्ससमोर रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीने तिला जोरदार धडक दिली. अपघातात ती गंभीर जखमी झाली. उपचारांसाठी नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.