भक्तीचा अनोखा ‘सुलेखन अक्षरयज्ञ’

महाराष्ट्र टाइम्स
भक्तीचा अनोखा ‘सुलेखन अक्षरयज्ञ’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
विद्यार्थ्यांसमोर झालेल्या एका प्रवचनात हभप प्रा. बांगर सर यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे हस्तलिखित ासह पारायण करण्याचे आवाहन केले होते. सुंदर हस्ताक्षर असलेले संतोष यांनी हा विचार तातडीने आचरणात आणला. अत्यंत वेगाने आणि अद्भूत एकाग्रतेने त्यांनी केवळ ४२ दिवसांत नऊ हजार ३३ ओव्यांचे सातशे श्लोक हाताने लिहून ‘ज्ञानेश्वरी’चे हस्तलिखित पूर्ण केले. त्यानंतर चार महिन्यांत संत तुकाराम महाराजांची ४,५५९ अभंग असलेली गाथा त्यांनी स्वहस्ताक्षरात लिहून काढली. भगवद्गीतेतील सर्व श्लोक, प्रत्येक शब्दाचा संधी विग्रह, मराठी अर्थ आणि संपूर्ण श्लोकाचा भावार्थ अशा अभ्यासपूर्ण पद्धतीने चारशे पानांच्या रजिस्टर वहीत त्यांनी गीतेचे हस्तलिखित पूर्ण केले. त्यासाठी त्यांनी तीन महिने २१ दिवस लेखन केले. याशिवाय कीर्तनकार श्यामगावकर भजनीमालिका १,१७१ अभंग (दोन वर्षे), चांगदेव पासष्टी (१ महिने २७ दिवस) या ग्रंथांची हस्तलिखितेही त्यांनी तयार केली.

आजच्या डिजिटल युगात तरुणाईतील मोठा वर्ग सोशल मीडिया आणि आभासी दुनियेत स्क्रोलिंग करण्यात मग्न असताना, शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील ग्रंथपाल दशरथ काळे यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात ज्ञानेश्वरीसह इतर सहा धार्मिक ग्रंथांचे सुलेखन केले आहे. सध्या ते ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाचे सात खंडांतील २९७ अध्याय आणि सुमारे ४० हजार ओव्यांचे हस्तलिखित तयार करण्याचे काम करीत आहेत.
वाचनालयात ग्रंथपाल म्हणून काम आणि पेंटिंगची कामे करून कुटुंबाचा गाडा हाकणारे संतोष काळे यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी, संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा आणि भगवद्गीता यांसह सहा मोठे धर्मग्रंथ स्वतःच्या अक्षरात लिहून काढले आहेत.या अक्षरसेवेचे तालुक्यात कौतुक होत आहे.

संतोष काळे तिसरी इयत्तेत शिकत असताना गावात श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे आगमन झाले होते. या निमित्ताने त्यांच्या हाती ‘गजानन विजय’ हा ग्रंथ पडला. त्यातून संतोष यांच्या मनावर भक्तीचे संस्कार झाले. ‘हा ग्रंथ कधी तरी आपण स्वतःच्या हस्ताक्षरात उतरवायचा,’ असा संकल्प त्यांनी केला होता. पुढे गावात भजन, कीर्तन आणि हरिपाठात रमणारे संतोष यांनी हा ध्यास कायम ठेवला.

दिवसभर काम केल्यानंतर रात्रीच्या वेळी संतोष यांनी रात्रीच्या वेळी सुलेखनाचे काम सुरू ठेवले. मनात आध्यात्मिक भावना असल्याने त्यांचा हा केवळ छंद न राहता एक अखंड ‘ अक्षरयज्ञ ’ बनला. ‘तरुणाईने केवळ मोबाइल किंवा सोशल मीडियात वेळ वाया न घालवता आपल्या धार्मिक ग्रंथांचे वाचन, मनन आणि आचरण करावे,’ अशी अपेक्षा संतोष काळे यांनी व्यक्त केली.