शिका ‘माइंडफुलनेस मेडिटेशन’

महाराष्ट्र टाइम्स
शिका ‘माइंडफुलनेस मेडिटेशन’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
चिंता, भीती, काळजी आणि त्यातून निर्माण होणारी अती विचार करण्याची सवय यामुळे मानसिक ऊर्जा खर्च होत राहते. जीवनातील महत्त्वाची उद्दिष्टे साध्य करण्याऐवजी मानसिक गुंतागुंतीत व्यक्ती अडकून पडते. त्यामुळे चिडचिड वाढते, निर्णय घेणे कठीण होते आणि मन सतत अस्वस्थ राहते. यावर प्रभावी उपाय म्हणून जगभरात स्वीकारली गेलेली ‘ माइंडफुलनेस मेडिटेशन ’ अर्थात पूर्णभान आधारित ध्यानधारणा ही अतिशय महत्त्वाची पद्धत मानली जाते.

तुम्हालाही मन शांत ठेवण्याची, विचारांमध्ये स्पष्टता आणण्याची आणि तणावावर प्रभावीपणे मात करण्याची ही पद्धत शिकायची आहे का? याच उद्देशाने अनुभवी मानसशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ‘माइंडफुलनेस मेडिटेशन मास्टरक्लास’ आयोजित करण्यात आला आहे. श्रीधर कुलकर्णी हा मास्टरक्लास घेणार आहेत. ‘मटा कल्चर क्लब’ उपक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.
ही कार्यशाळा पूर्णपणे प्रात्यक्षिकांवर आधारित असून, सहभागी व्यक्तींना मानसिक सजगता आणि ध्यानाच्या तंत्रांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. ‘मनाशी संवाद... तणावाला पूर्णविराम!’ हा या सेशनचा महत्त्वाचा उद्देश आहे. चार तासांच्या या मास्टरक्लासमध्ये सहभागी व्यक्तींना बाह्य परिस्थिती कितीही बदलत असली, तरी मनात शांतता, स्थिरता आणि स्पष्टता कशी टिकवून ठेवावी, याचे प्रशिक्षण दिले जाईल.

ताण, चिंता, अती विचार, मानसिक थकवा किंवा भावनिक अस्थिरता अनुभवणारे व्यावसायिक, विद्यार्थी, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक; तसेच मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणारे सर्व जण या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात. मर्यादित प्रवेश असल्यामुळे प्रत्येक सहभागीवर वैयक्तिक लक्ष देता येणार आहे. इच्छुकांनी आपले नाव लवकरात लवकर नोंदवावे.