महेश पतंगे यांचे निधन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
महेश पतंगे यांचे निधन
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि विद्या भारतीचे गुजरात प्रांत संघटनमंत्री महेश पतंगे (वय ५७) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, वहिनी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव मोतीबाग कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

मूळचे पुण्याच्या लष्कर भागातील असलेले महेश तरुण वयातच संघकार्यासाठी प्रचारक म्हणून बाहेर पडले. त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. सन १९९४ ते १९९६ या कालावधीत त्यांनी कर्जत तालुक्यात प्रचारक म्हणून काम पाहिले. त्यानंतर १९९६पासून त्यांनी गुजरात प्रांतात शहर प्रचारक, विभाग प्रचारक म्हणून काम केले. सध्या ते विद्या भारती , गुजरात प्रांताचे संघटनमंत्री होते.